पाण्यासाठी दाही दिशा

Yesterday, found a poem I had written in 7th standard. Put it in a rhythm and sing it away...
Continue reading for copyable text
उजाडला नवा दिन
अन् सरली रे निशा ।
        आता भटकायाचे आहे
        पाण्यासाठी दाही दिशा ॥ धृ ॥ 

आभाळातला तो देव
असा कसा रे कोपला । 
        धरणीच्या पोटातला
        पाणीसाठा रे लोपला ॥ 
आम्ही पाण्याचे भिकारी
काय आमची ही दशा ।
        आता भटकायाचे आहे
        पाण्यासाठी दाही दिशा ॥ १ ॥ 

नाही देवाचीही चूक 
नाही धरणीचा गुन्हा । 
        मोकाट आम्ही सारे 
        प्रदूषण करतो पुन्हा ॥ 
बेधुंद वागण्याची
आम्हां चढली आहे नशा ।
        आता भटकायाचे आहे
        पाण्यासाठी दाही दिशा ॥ २ ॥ 

करा वृक्षांचे रोपण 
झाडे-वेली या जगवा । 
        वृक्षवल्लींना या साऱ्या
        देवाप्रमाणे वागवा ॥ 
उरली आहे आता 
शेवटची हीच आशा । 
        मग गरज नाही फिराया
        पाण्यासाठी दाही दिशा ॥ ३ ॥ 

No comments :

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.