पहिली पासून IIT पर्यंत (संक्षिप्त)

[१५ डिसेंबर २०१२] मी IIT Madras मध्ये सध्या संगणकशास्त्राचे शिक्षण घेत आहे. IITJEE २००९ मध्ये माझा संपूर्ण भारतातून १८४वा क्रमांक आला होता. अशातच झालेल्या IIT Madras campus placement मध्ये मला मिळालेल्या यशानंतर (अनुभव इथे वाचू शकता) मला इतके messages आणि इतके mails आले, की ठरवलं, आता एक  blog-post च लिहावा लागणार!

पार्श्वभूमी:
मी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब गावचा. इयत्ता दहावी पर्यंत माझं शिक्षण माझ्याच गावच्या मराठी माध्यमाच्या शाळेत झालं. आई आणि वडील दाघेही स्थानिक कनिष्ठ आणि वरिष्ठ (अनुक्रमे) महाविद्यालयामध्ये शिकवतात. मी सध्या माझ्या engineering च्या शेवटच्या वर्षात आहे

पहिली ते नववी :

 • शाळेत वर्गात जे काही शिकवलं, ते सारं लक्ष देऊन, पूर्ण एकाग्रतेने ऐकलं.
 • उद्या जे काही शिकवलं जाणार असेल, ते सारं पाठ्यपुस्तकांमधून जणू काही गोष्ट वाचावी, असं वाचलं. (जेवढं, समजलं तेवढं ठीक, बाकी वर्गात शिकवल्यावर बघू)
 • मार्गदर्शक पुस्तकं कधीच वापरली नाहीत.
 • कोणत्याही गोष्टीची घोकंपट्टी कधीच केली नाही. विशेषतः विज्ञान आणि गणितामध्ये तर प्रत्येक संकल्पना पूर्णपणे समजून-उमजून घेतली.
 • सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आवर्जून भाग घेतला. विशेषतः ४थी आणि ७वी च्या वर्गात असताना शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा आणि ८वी आणि ९वी च्या वर्गात असताना महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा.
 • आत्मविश्वास वाढला तो स्पर्धा परिक्षांमुळेच. माझ्या मते, या त्या परीक्षा आहेत, ज्यांमध्ये तुमचा खरा कस लागतो.
 • अभ्यास कधीच तासांवर मोजून केला नाही. लक्षात ठेवा, अभ्यास म्हणजे काही "रोजंदारी" नाही, तासांवर मोजायला! जोपर्यंत आपल्या संकल्पना स्पष्ट होत नाहीत, जोपर्यंत आपल्या मनाचं समाधान होत नाही, तोपर्यंत अभ्यास हा करायलाच हवा.
 • अभ्यासाचा डोंगर कधीच होऊ दिला नाही. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी, त्या आठवड्यामध्ये काय काय शिकलो, ते पक्कं झालंच पाहिजे याची खात्री केली.

दहावीचं वर्ष:
सर्वांप्रमाणेच मीही सामान्यपणे अभ्यास करत होतो. मागील वर्षी, इयत्ता ९वी मध्ये माझा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक आला होता. दहावीच्या दिवाळीच्या सुट्ट्यांच्या आसपासच्या काळात महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेच्या संचालकांनी माझ्या वडिलांना विचारलं, "सुजित पुढे काय करणार आहे?" पप्पा म्हणाले, "ठरवलं नाही आणखी काही पक्कं, पण, डॉक्टर आणि नंतर IAS असा विचार आहे सध्या." तेव्हा त्यांनी पप्पांना सांगतलं IIT बद्दल की "IITs म्हणून colleges असतात, भारतातलं सगळ्यात चांगलं अभियांत्रिकी शिक्षण मिळतं तिथं... वगैरे वगैरे." त्यांनी ही पण गोष्ट लक्षात आणून दिली की मला गणित आणि भौतिकशास्त्र यांमध्ये जास्त रस आहे, मग डॉक्टर कशाला? आणि तेव्हा, ठरलं की IITJEE साठी तयारी करायची.

IITJEE ची तयारी करायचा निर्णय घेतला आणि अभ्यासाची पूर्ण दिशाच बदलली. पक्कं ठरवलं की आता बोर्डामध्ये किती मार्क पडतात याचा विचारच करायचा नाही. हैदराबादचा रामय्या कोचिंग क्लास हेच ध्येय ठेवलं होतं, तिथे प्रवेश देताना बोर्डाच्या मार्कांचा विचार करत नाहीत. मनात खात्री होती की  बोर्डाच्या  परीक्षेचा आतापासून अभ्यास जरी केला नाही, तरी आपण नापास काही होणार नाही आहोत! पप्पांनी हैदराबादला जाऊन मातृश्री या foundation coaching classes ची पुस्तकं आणली. त्यानंतर मी पूर्ण क्षमतेने आणे एकाग्रतेने त्या पुस्तकांचा आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा अभ्यास सुरु केला. आत्तापर्यंत सगळं शिक्षण मराठी मध्ये झालेलं असल्यामुळे सुरुवातीला त्या पुस्तकांचा अभ्यास करणं थोडं अवघड गेलं... पण आत्मविश्वास ढळू न देत, जवळ एक शब्दकोश ठेवून, अभ्यास करत राहिलो.

बोर्डाची परीक्षा झाल्यानंतर रामय्याच्या प्रवेश परीक्षेसाठी काही वेळ शिल्लक होता. तेंव्हा एक महिना हैदराबादला मातृश्री classes मध्येच crash course केला. त्यादरम्यान खूप खूप खचलो होतो काही काळासाठी... इतर मुले येत असल्यापेक्षा खूप जास्त येत असल्यासारखं दाखवायची... कधी कधी शिक्षक सुद्धा "रामय्या प्रवेश परीक्षा खूप अवघड आहे" अशी भीती घालायचे... काही शिक्षक "रामय्या आता काही एवढं चांगलं राहिलं नाही" अश्या अफवा पसरवायचे... पण आई-पप्पांनी धीर दिला, माझा आत्मविश्वास खचू दिला नाही. Crash course सुरु असतानापण मी मनापासून अभ्यास केला. माझ्या मते, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे "अभ्यासाचा विषय मनापासून आवडणे!" जवळपास १०,००० विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या २०० विद्यार्थ्यांमध्ये मी एक होतो! सांगायची गरज नाही: १०वी मध्ये मला फक्त ९२% च मार्क पडले. पण आज अभिमान वाटतो की त्या toppers पेक्षासुद्धा आज मी माझ्या शिक्षणावर जास्त खुश आहे.

 IITJEE ची तयारी:
 • जवळ जवळ "पहिली ते नववी"मधले सगळे मुद्दे.
 • Physics साठी Resnick and Halliday, H. C. Verma आणि class notes.
 • Chemistry साठी O. P. Tandon, J. D. Lee  आणि class notes.
 • Maths साठी Tata McGraw Hill, A. Dasgupta आणि class notes.
 • शेवटचे ४ महिने FIITJEE ची All India Test Series.
 • तयारी कधीच MCQ डोळ्यांसमोर ठेवून केली नाही. प्रत्येक संकल्पना, गणितातली सूत्रे, रसायनशास्त्रातल्या अभिक्रिया नीट समजावून घेऊनच अभ्यास केला. घोकंपट्टी कधीच केली नाही.
 • या तयारीवरच Olympiad च्या परीक्षा पण दिल्या.
 • दररोज सातत्याने अभ्यास, मनापासून त्या त्या विषयांची आवड आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समविचारी, समान क्षमतेच्या मित्रांबरोबर केलेला अभ्यास!
संदर्भ:

कृपया मला या विषयांवर email किंवा Facebook message पाठवू नका. काही प्रश्न, शंका असतील, तर त्या इथे comments section मध्ये विचारा. धन्यवाद.

Disclaimer: 
मी इथे कोणत्याही coaching class ची, किंवा पुस्तकांची जाहिरात करत नाहीये, तर फक्त माझा अनुभव आणि संबंधित facts मांडतो आहे. जर वरील लेख वाचून "IITJEE मध्ये खात्रीच्या यशासाठी अमुक पुस्तक वापरा आणि तमुक class join करा" असा तुमचा समज झाला असेल, तर त्याला मी कोणत्याही पद्धतीने जबाबदार नाही.

6 comments :

 1. Hi sujeet,i want to learn a programming language so for which should i go? I m nt from cs bckgrnd (ec),so it should be easy to gras, interesting n nt used to its extent as it should be.....plz

  Reply Delete
 2. Hi...Mahesh Joshi here from Dainik Bhaskar groups Marathi newspaper Daily Divya Marathi. Interested to file a news story on your grand success. Please tell me how and when we can get in touch? (i.e. by mail, chat or by a phone call. my cell number is 9823440035.
  )

  Reply Delete
 3. अप्रतिम ! प्रत्येक विद्यार्थ्याने नक्की वाचावे असे !

  Reply Delete
 4. abhinadan sujeet ,tula tuzya bhawi ayushyasathi anekanek subheccha

  Reply Delete
 5. Thanks for sharing your blog and appreciated for your hardwork.

  Reply Delete
 6. hi... tell me programming language detail information & C-DAC information

  Reply Delete

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.